• Thu. May 16th, 2024

मनतरंग ५ जानेवारी २३

Byswapnilthoughtika

Jan 5, 2023
मनतरंग भाग ४

आज काहीतरी लिहायचय पण पेन चालत नाही. कोणत्या वहीत लिहायचं ते कळत नाही. डोक नुसत विविध विचार आणि आकांशांनी भरलेल.

एकिकडे जिवनात पुढे जाण्याची अपेक्षा काहीतरी दिवास्वप्न साकारण्याची इच्छा एकिकडे देवि विषयीच वेड, आयुष्यात आलेल्या जबाबदाऱ्या आणि स्वतःशी विस्कटलेला संवाद. प्रत्येक ठिकाणी असलेले ऑप्शन्स आणि चॉइस करता करता निघुन गेलेले आयुष्य आणि सर्व आशा अपेक्षा वेळे अभावी आधुरया राहण्याची भीती.

मनातल नुसत कागदावर लिहायच म्हटल तरी मन नाटक करते. शरीर पण आळशी झाल्याच आव आणते कोणती वही विकत घे त्यात लिही भारीतली घे. त्यात ऑफिस मध्ये अगोदरच 2५-३० वहया पडलेल्या तरी हे मन असे का करते तेच कळत नाही.

शेवटी अनेक YouTube शॉर्टस पाहताना एका ठिकाणी अढळले मनाची व्यथा भारतीय मनाला छोट्या छोट्या गोष्टी करायला कमीपणा वाटणे. करायचं तर मोठच करायच अस त्याची अपेक्षा आणि स्वप्न मोठा आणि काम कमी करण्याची हौस .

शेवटी कस बस मन तयार करून लेटरहेड साइजच्या रिमचा बंडल घेतला व त्यातुन एक डझन पानाचा गठ्ठा काढला आणि स्टेपलर करून लिहायला सुरवात केली.

आणि म्हटल हया २४ पाठोपाठ पाणा पैकी कमीतकमी 20 पाण तरी भरू पण आत्ता वाजलेत रात्रीचे २०:४० आणि पाहुया आज मी किता लिहितोय

आता लिहिलेल कोणीतरी दुसऱ्याने वाचाव अस काहीच नसत पण आपण सहसा याच अपेक्षेमुळे लिहीण टाळतो. कारण इथे देखील मनाचा इगो हर्त होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *