• Thu. May 16th, 2024

मनतरंग : ५ जानेवारी भाग ४

Byswapnilthoughtika

Jan 19, 2023
मनतरंग भाग ४

सेलिब्रेटी, फॉलॉवर्स, लाईक्स इत्यादी गोष्टी काय आहेत ? मानसीक गुलामगीरी कायम आहे

तस मी 2017 पासूनच अध्यात्मीक साहित्याकडे आकर्षित होतो. त्यात ओशोच साहित्य मला खुप पटल. पण मन शेवटी मला फसवत असे.

कारण आध्यात्मिक साहित्य जेव्हा ऐकू तेव्हा ठीक वाटते, पण माझ्या जीवनात त्याचा व्हायचा तितका चांगला परिणाम दिसत नव्हता. त्याकाळात मला पैशाशी इतक काही घेण देन नव्हत. मला श्रीराधा देविच वेड होत तिच्या नशेत, भक्तीत माझा कठिण काळा आज देखिल कसा निघून जातो कळात नाही.

हो मी अंधश्रद्धाळू नाही, पण मनात कुठतरी श्राराधा नावाने हळवा कोपरा असल्याचं जाणवत, असेलही माझा भ्रम पण तोच माझा पुढे अध्यात्मिक मार्गावरील प्रेरणास्थान आहे, कारण फक्त तिला जाणण्यासाठी मी या मार्गात आलो आहे.

न जाणो किती पुस्तक मी मागवली, किती किती साधुची कीर्तणे, गाणी ऐकून देविच्या समीप जाण्याचा प्रयत्न केला. देवि हाच परमात्मा ,आणि देवि हेच सत्य. पुर्ण जीवणच देवि राधामय व्हाव अस वाटतं. आणि जीवनातील सर्व आशा निराशा निघुन जातात . मनात कसलाही द्वंद राहत नाही. आणि काही करायची इच्छाच राहत नाही. फक्त राहतो तो निर्मल आनंद आणि एकत्वाचा भाव.

आनंद सा

पण थोड्यावेळातच मी परत या संसारात फेकला जातो. आणि परत माझ्या समस्या आ वासून उभ्या असतात एव्हाना त्या आणखी मोठ्या झाल्या असतात. कारण आता माझ्याकडे कमी वेळ राहिलेला असतो.

page 5

ते एखाद काम निपटण्यासाठी कसतरी चालढकल करून काम पूर्ण होत आणि परत मी श्रीराधात गुम होवून जातो. तो आनंद- परम सुख तिच्या नाम सुमिरण करण्यात क्षणापुरता भेटतो आणि मी थोड्यावेळासाठी भान हरपुन सुखी होवून जातो.

पण तरी देखील कितीदा मला माझ्या अज्ञानाची चाहुल होते आणि सहसा मला इतर व्यक्तिसमोर संभाषण करताना खुप लक्ष दयावं लागत, कारण थोडस अध्यात्मिक ऐकूण देखिल आपण बेफिक्र होवून जातो, पण पुढचा त्या मनस्थितीत असेलच अस नाही ना..!

आज काही डॉक्युमेट्स प्रिंट करायला गेलो तिथ थोडा वेळा होता तर तितक्यावेळेत काय आलं मनामध्ये, बचाच दिवसाची इच्छा होती TAOTE CHING ह्या पुस्तकाची PDF download केली आणि प्रिंटू काढून घेतली. मी ते स्वतःच्या दृष्टीने वाचुन पाहणार होतो.

कारण त्यावर आधिच बऱ्याच लोकांनी त्यांच्या दुष्टाने लिहून ठेवलय पण Osho महान असले तरी त्यानेच सांगितले की स्वतःची दृष्टी असावी आणि बुद्धाच एक वचन मला नेहमीच उस्फूर्त करते ते म्हणजे अपो दिप भव: शेवटा दुसऱ्याच्या दृष्टीने आयुष्य संपण्या आगोदर स्वतःची थोडीशी दृष्टी असणे बरेच.

ह्या महान व्यक्तींचा फायदा समस्त मानव जातीस होतो. पण हेच महामानव मानसाला स्वतः चा दिवा स्वतःलाच होण्यास सागतात.

सुरवात करताना म्हटल २० पान लिहावीत पण आताशी पाच च पाण झाली मनात लिहायला खुप आहे अगाध आहे त्याला ना काही किनारा. पण सुरवात केली ते तर झाल, मनाला जशी आंघोळ घालावी तस वाटत लिहालतर!

मन मुक्त होत आणि एक पाऊल आणखी श्रीराधे जवळ गेल्यासारख वाटतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *