• Thu. May 16th, 2024

मनतरंग : ५ जानेवारी भाग ३

Byswapnilthoughtika

Jan 18, 2023
मनतरंग भाग ४

AC मध्ये बसून yesबास No बॉस करणे अजाबात पटत नाही. स्वधारा आपल्या मनातून फुटला पाहिजे आणि आपल्याला भटतात – अशी माणसे विविध क्षेत्रातून ते अनुभव वेगळेच !

नाही तर एकाच प्रकारची, मुंग्यांप्रमाणे एकाचू वारुळात (office) जाणारी माणसं अगदी रोबोट सारखी . त्यांचा तो शनिवार व रविवारचा एंजॉय तो एंजॉय म्हणजे सोमवार ते शुक्रवार पर्यन्त नावडीने केलेल्या कामाचा व नावडीने जगलेल्या जीवनाचा परीणाम दिसतो. जसे एखादया कोंडवाड्यातून गाई म्हशी सोडाव्यात. त्यांच्या त्या लोणावळा, पावणा लेक, लोहगड इथ होणाऱ्या गोंगाटात कसलाच आनंद दिसत नाही पण थोडेफार मुक्त झाल्याचा सुखाचा लवलेश दिसतो.

तस माझ मत पुस्तकांविषयी पण भिन्न आहे. बरीचशी बेस्ट सेलर पुस्तके पण एखाद्या शातीर कार्पोरेट सेक्टर ने समाजातील तरुणांचे ब्रेनवॉश करण्यासाठी लिहलेत असंच वाटते. जर त्या लेखकाने पुर्ण पुस्तक स्वतः लिहील असेल तर आपण ते वाचलंतर त्यात त्याचीच तफावत जाणवते, बरेचदा मात्र आपण ती शंका तशीच ठेवून पुस्तक पण वाचुन टाकतो.

Social मेडीयाने जसे खुप फायदे दिले, तसे आपल्याला कमकुवत देखील बनवले. आपण आपला विवेक, तर्कशक्ती हळूहळू कमजोर करत बसलो.

आज कोणी तुम्हाला बेड्या घालुन गुलाम बनवत नाही तर तुम्हाला अहिंसक पद्धतीने देखील गुलाम बनवतात. कारण त्यात त्यांचा आर्थिक फायदा, पण होतो आणि आज जितके धन असेल तो जितके आणखी गुलाम तयार करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *