• Thu. May 16th, 2024

मनतरंग : ५ जानेवारी भाग २

Byswapnilthoughtika

Jan 14, 2023
मनतरंग भाग ४

मन म्हणते मी फुकट लिहणार नाही, माझा प्रत्येक शब्द अनमोल आहे आणि अशा कितीतरी बकवास मनात दडलेली असते. पण माझा सदयस्थिति अशी आहे की मला लिहीण्यावाचून पर्याय नाही.

कारण मी एकदम एकटा पडलेला आहे. मी समाजात तर आहे , घरच्या बरोबर आहे , पण माझ्या कामा मध्ये इंटरेस्ट नाही कारण प्रत्येकजण एका विलक्षणा घाइत आहे.

आणि दिवसातून २ ते ४ वेळा घरा समोरून जाणारी अंत्य यात्रेची गाडीतून ते “हे राम “च गाण वाजत असते. आणि मला मृत्युची आठवण करून देते.

मरणा पूर्वी लिहून जाव अस वाटतं , भले ते कोणी वाचो किंवा नाही.

आज मला परीवार आहे १ वर्षाची मुलगी आहे. माझा इतका इनकम नाही , सहसा बरेच टक्के मी घरच्यांवर अवलंबुन आहे. पण मी अजून प्रयत्न सोडले नाही.

प्रयत्न करत राहणे याला आता पर्याय नाही. शिक्षणाचा आणि उत्पन्नाचा फरक लक्षात येतो. आज एखाद्या MNC मध्ये बसून या लाखो रुपयाची नोकरी करत असतो, पण आयुष्य कुजूले असते. म्हणून मी नोकरी २ वर्षा नंतर सोडून दिली. त्या मार्गाने मला मोकळ जगता नसते आले , आणि मुळातच ती लाइफ मला आवडत नाही. मला त्या पुण्याच्या गर्दीत स्वतःला हरवून जायच नव्हत .

आणि जगात प्रसिद्ध झाल नाही तरी चालल पण अस एकदम लयबद्ध जीवन अजीबात नको होत.

“जो पर्यंत संघर्ष आहे तो पर्यंतच जीवन आहे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *